|सहकारनामा|
दौंड : दि 10 जून रोजी सहायक निबंधक कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार संदीप विश्वनाथ होले यांची 9 विरुद्ध 8 मताने निवड झाली. होले यांच्या विरुद्ध बाळासाहेब काटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र काटे यांचा केवळ एक मताने पराभव झाला.
आप्पासाहेब कुल यांचे या संस्थेवर 1995 पासून वर्चस्व आहे मात्र गेल्या वर्षभरात कुल यांचे कार्यकर्ते विकास शेलार यांनी विरोधी समितीच्या सहाय्याने सत्ता हस्तगत केली होती मात्र ती कायम राखण्यात त्यांना अपयश आले. संदीप होले हे संघाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याने सर्वच शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
होले यांच्या निवडीप्रसंगी शांताराम काका जगताप, शरद धुमाळ, रामभाऊ दोरगे, राजाभाऊ लडकत, नंदुभाऊ शिंदे उपस्थित होते. 1995 सालापासून प्राथमिक शिक्षक संघाचे व आप्पासाहेब कुल यांचे वर्चस्व या संस्थेवर राहिले आहे.