कुरकुंभ MIDC तील ‘त्या’ कंपन्यांवर त्वरित ‘कारवाई’ करा अन्यथा ‘आमरण उपोषण’ करणार – शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष ‘वसंत साळुंके’ यांचा ईशारा

दौंड : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे रासायनिकयुक्त पाण्यामुळे तलावातील मासे व जलचर जीव मृत्युमुखी पडल्याने या कंपन्यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा येत्या काही दिवसांत आमरण उपोषण करण्याचा ईशारा शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके यांनी महाराष्ट्रात प्रदूषण मंडळ यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे. या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबत वसंत साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या असुन या कंपन्यांमधुन बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्यावर सदर कंपन्या कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता पावसाळ्यामध्ये पावसाच्या वाहत्या पाण्यामध्ये हे रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडुन देतात. हे रसायनयुक्त उघड्यावर सोडलेले पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन मळद येथील तलावात जात असल्याने या तलावातील असंख्य मासे व जलचर जीव मरण पावलेले आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी झालेली आहे.

मागील आठवड्यात म्हणजे दि.२१/०९/२०२३ ते ३०/०९/२०२३ च्या दरम्यान पडलेल्या पावसात असे रसायनयुक्त पाणी काही कंपन्यानी उघड्यावर सोडल्याने पावसाच्या पाण्यासोबत तलावात वाहुन गेल्याने तलावातील असंख्य मासे व जलचर जीव मृत्युमुखी पडलेले आहे. त्यामुळे जलचर जीवांना धोका निर्माण होऊन पर्यावरण धोक्यात आलेले आहे. सदर कंपन्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणाबाबत घालुन दिलेले नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडत असल्याने या कंपन्या जल प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन करुन पर्यावरणांस धोका निर्माण करीत आहेत.

तरी याबाबत त्वरीत चौकशी करुन या बेजबाबदार कंपन्यावर जल प्रदुषण कायदा १९७४, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींप्रमाणे कठोर कारवाई करावी व अशा कंपन्यांना आपण प्रकल्प सुरु करण्यासाठी दिलेले परवाना (संमती) रद्द करून उत्पादन प्रक्रिया बंद करण्याचे आदेश द्यावेत, तसेच या कंपन्यांचा पाणी व वीज पुरवठा बंद करण्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत.
याबाबत आपण गांभीर्याने दखल घेऊन १५ दिवसात कारवाई करावी. तसे न झाल्यास
आपल्या कार्यालयासमोर दि. १८/१०/२०२३ पासुन बेमुदत उपोषण करण्यात येईल याची
नोंद घ्यावी असा ईशारा यावेळी वसंत साळुंके यांनी दिला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

16 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago