दौंड मधील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर व शाही आलमगीर मशीदिस खा. सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा भेट, युनिसेफ पुरस्कार प्राप्त आभा लांबा यांनी दोन्ही पुरातन वास्तूंची केली पाहणी

दौंड : दौंड शहरातील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर व शाही आलमगीर मशिद या दोन ऐतिहासिक पुरातन वास्तूंना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत युनिसेफ पुरस्कार प्राप्त आभा लांबा उपस्थित होत्या. आभा लांबा या रेस्टोरेशन आर्किटेक्ट आहेत, मुंबईतील बाळासो ठाकरे स्मारकाचे काम आभा करता आहेत, त्याच बरोबर मुंबईतील नियोजित टेक्स्टाईल म्युझियमचे काम होणार आहे यामध्येही आभा यांचे योगदान असणार आहे. मुंबई विद्यापीठाचे रेस्टोरेशन चे काम त्या पाहणार आहेत अशी माहिती खा सुळे यांनी दिली.
आभा लांबा यांनी यावेळी विठ्ठल मंदिर व शाही आलमगीर मशिद या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंची बारकाईने पाहणी केली. या वास्तू योग्य पद्धतीने जतन करण्या साठीच्या महत्त्वाच्या उपाययोजना आभा यांनी सुचविलेल्या. विठ्ठल मंदिर समिती आणि आभा यांनी एकत्रित बैठक घेऊन ही पुरातन वास्तु कशी जतन करता येईल असे काम करण्याची योजना आहे. हा आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे हे समजून स्थानिक भाविकांकडून काही सूचना असतील तर त्यांच्या भावनांचाही विचार व्हावा व फक्त काम वेळेत व्हावे अशी सूचना खा. सुळे यांनी मांडली.
खा. सुळे यांनी यावेळी पत्रकार परिषद घेऊन सदरचे काम कशा पद्धतीने करावयाचे आहे यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी शहरातील वादग्रस्त ठरलेल्या व अति रेंगाळलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामाबाबत त्यांना माहिती दिली, येथील संबंधित रेल्वे अधिकारी आपणाला वारंवार चुकीची माहिती देत आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळेच सदरचे काम मागील 7ते 8 वर्षापासून रेंगाळलेले आहे असे पत्रकारांनी त्यांना सांगितले असता,सुळे यांनी थेट रेल रोको आंदोलन करण्याचाच पवित्रा घेतला.येत्या 1 मार्च रोजी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दौंड रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात रेल रोको आंदोलन करणार असल्याचे सुळे यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मा. आमदार रमेश थोरात,आप्पासो. पवार, गुरुमुख नारंग,वीरधवल जगदाळे, सोहेल खान, विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गोपाळराव नगरकर, सचिन कुलथे, रामेश्वर मंत्री, अशोक जगदाळे,विठ्ठल मंदिराचे पुरोहित सुधीर गटणे, अतुल गटणे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.