‘खा.सुप्रिया सुळे’ यांनी दिल्या ‘आमदार राहुल कुल’ यांना शुभेच्छा, राज्यातूनही शुभेच्छांचा वर्षाव

पुणे : दौंडचे विद्यमान आमदार राहूल कुल यांचा आज दि.३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या शुभेच्छांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छांनी. खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट करून आ.राहुल कुल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खा.सुप्रिया सुळे यांनी कुल यांना शुभेच्छा देताना, दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. अश्या अशयाच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा कुल आणि पवार यांच्यातील ऋणानुबंध किती घट्ट आहेत हे दाखवून दिले आहे. खा.सुळे यांनी मागील काळातही कुल कुटुंबियांच्या सुसंस्कृत पणाचं कौतुक केललं आहे.

राज्यातील विविध मान्यवरांनी सुद्धा आ.राहुल कुल यांना वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या असून यामध्ये, माजी मुखमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना फोनकरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.