केडगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे विजय संदीपान डेंगळे ( वय ५५, रा.केडगाव स्टे. ता.दौंड जि.पुणे) यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या अगोदर घडली असून मृताचा भाऊ संजय डेंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

विजय डेंगळे हे केडगाव स्टेशन येथे पान दुकान चालवत होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी व्यवसायात उभारी घेऊन आपले कुटुंब सांभाळले होते. प्रत्येकाशी नम्रपणे हसून बोलणे ही त्यांची खासियत होती. विजय डेंगळे यांच्या मृत्युची खबर मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली होती. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकले नाही.

घडलेल्या घटनेची फिर्याद संजय डेंगळे यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास केडगाव पोलीस स्टेशनचे एएसआय बाळासो गाडेकर हे करीत आहेत.