Categories: Previos News

देलवडी येथे ‛महिला पोलीसाची’ गळफास घेऊन ‛आत्महत्या’, धक्कादायक माहिती उजेडात येणार

दौंड : दौंड तालुक्यातील देलवडी येथे एका 26 वर्षीय महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर येण्याची शक्यता आहे.

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याने गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर याबाबत पोलीसांकडून अधिकृत माहिती मिळणार आहे. याबाबत यवतच्या महिला पोलीस अधिकारी तावरे यांच्याशी संपर्क साधला असता महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला असून स्पॉट पंचनाम्यानंतर सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महिला पोलिसाचे काही दिवसांत लग्न होणार होते अशी माहिती समोर येत असून या महिला पोलीसांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलावे लागले याबाबत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन पोलीस भरती झालेल्या या मुलीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago