Categories: क्राईम

दौंड’मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

दौंड शहर प्रतिनिधी – अख्तर काझी

दौंड : दौंड मधील भीमनगर येथे राहणाऱ्या एका 34 वर्षीय युवकाने आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. शिवाजी विठ्ठल जगताप (वय 34,रा. भीम नगर ,दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दौंड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

भाऊ सतीश विठ्ठल जगताप याने दौंड पोलिसांना सदर घटनेची खबर दिली. दौंड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद जरी केली असली तरी ही आत्महत्या नसून त्याने त्याच्या सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा आरोप करीत, सासरच्या संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी दौंड पोलिसांकडे केल्याने सदरचे प्रकरण चीघळण्याची चिन्हे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा.च्या पूर्वी सदरची घटना घडली आहे. मयताची भाऊजय हिने आपल्या पतीस माहिती दिली की तुमचे भाऊ सकाळपासून आपल्या खोलीतून बाहेर आलेले नाहीत, दुपारी जेवायला सुद्धा ते आलेले नाहीत त्यामुळे तुम्ही जाऊन त्यांना जेवायला घेऊन या. त्यामुळे मयताचा भाऊ व मित्रांनी जाऊन मयताच्या खोलीचा दरवाजा वाजवीला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता भावाने खोलीच्या छतास गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर भावाने तत्काळ दौंड पोलिसांना घटनेची खबर दिली. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago