दौंड : दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेने मारहाण आणि अब्रूच्या भीतीने आपल्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचे सासरे बापूराव शंकर सूर्यवंशी ( वय, 75 रा.जिरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
दौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीरेगाव-कुरकुंभ येथील फिरंगाई बजाज शोरूमचे मालक अमोल तान्हाजी देशमुख यांना हरीदास बाबुराव गाडवे यांनी निरोप दिला होता कि तुमचे शोरूममध्ये संतोष बापुराव सुर्यवंशी हा येत असतो त्यांची पत्नी गावामध्ये वेगवेगळ्या चर्चा करीत असते त्यामुळे या कारणावरून संतोष याने हरीदास गाडवे यांस याबाबत विचारपुस केली होती. यामुळे चिडलेल्या आरोपी धनाजी नारायण गाडवे, गणेश नारायण गाडवे, हरिदास नारायण गाडवे व दत्तात्रय अशोक जांभले यांनी फिर्यादी यांच्या घरी येवुन त्यांची सुन उज्ज्वला संतोष सुर्यवंशी व मुलगा संतोष बाबुराव सुर्यवंशी व दुसरा मुलगा संदिप बाबुराव सूर्यवंशी यांना काठीने मारहान करून शिवीगाळ केली होती. यावेळी त्यांची सून उज्वला सूर्यवंशी हिला आरोपिंकडून केस धरून मारहान करण्यात आली होती त्यामुळे ती मानसीक धक्क्याने घाबरून व अपमानीत होऊन तिने आपला मुलगा स्वराज संतोष सुर्यवंशी याला सोबत घेवुन घरातून बाहेर पडली होती. तीचा शोध घेऊनही तीचा थांगपत्ता लागत नव्हता.
त्यानंतर गावातील जाधव यांचे जमीनीती असलेल्या वीहीरीत तिचे व तिच्या मुलाचे प्रेत दोन दिवसांनी वर आल्यानंतर तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. महिला व तिच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दौंड पोलीस ठाण्यात आरोपी धनाजी नारायण गाडवे, गणेश नारायण गाडवे, हरिदास नारायण गाडवे व दत्तात्रय अशोक जांभले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.