नेत्याची बदनामी करण्याच्या प्रयत्नात ‘हुरडफुक्याने’ केली मोठी भूल, प्रकरण अंगलट येताच ‘त्याच्या’ झाल्या ‘बत्त्या गुल’

दौंड : दौंड तालुक्यात एका पॅकेज बहाद्दर तरुण तुर्क, म्हातारे अर्क हुरडफुक्याने काही नेत्यांची बदनामी करण्याचा विडा उचलला असून या हुरडफुक्याने आत्तापर्यंतचे भोगलेले आयुष्य हे लोकांना दम देण्यात, त्यांची टिंगल टवाळी करण्यात, लोकांचे फुकटचे खाण्यात अण त्यांना नावे ठेवण्यात घालवले असल्याची मोठी चर्चा तालुक्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कायमच होत असते.

‘गावात विचारेना कुत्र अण सोशल मीडियावर दाखवतो हजारो मित्र’ अशी काहीशी तऱ्हा झालेल्या या हुरडफुक्याने आता नवनवीन शोध लावण्यास सुरुवात केली आहे. याने घरी बसायचे, दोन झुरके मारायचे अण दुसऱ्यांच्या आलेल्या बातम्या कॉपी पेस्ट करून ते आपल्या माध्यमाला पाठवायचे अण स्वतःला महान लेखणी बहाद्दर म्हणून घ्यायचे असा काहीसा दिनक्रम या हुरडफुक्याचा बनला आहे.

या हुरडफुक्याच्या चमू ने तालुक्यात नुकतेच एका सर्वसामान्य नागरिकाची व्हिडीओ क्लिप तयार केली अण यात एका नेत्याला केंद्रस्थानी ठेऊन त्याची बदनामी करण्याची प्रक्रिया राबवली. मात्र त्या नागरिकाला ज्यावेळी आपली बेमालूमपणे क्लिप तयार करून ती व्हायरल केली जात आहे आणि त्यामध्ये एका नेत्याला नाहक बदनाम केले जात आहे हे लक्षात आले त्यावेळी त्याने थेट त्या नेत्याची भेट घेऊन हे षडयंत्र हुरडफुक्याच्या एका चमुने केल्याची स्पष्टोकती दिली.

ज्यावेळी ही व्यक्ती त्या नेत्यांना जाऊन भेटली अण आपल्याला कसे यात गोवले गेल्याचे सांगितले त्यावेळी या नेत्यांनी राग न मानता, या लोकांना आम्ही केलेली विकासकामे, आरोग्य विषयक कामे यांचे काही देणे घेणे नाही. यांना हाताशी धरून विरोधकांनी आम्हाला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु केला असून सुज्ञ जनता मात्र यांना यांची जागा दाखवेल, जनता सर्व पाहत असून ती वेळेवर यांना योग्य उत्तर देईल त्यामुळे मी असल्या गोष्टी जास्त मनावर घेत नाही असे या नेत्यांनी त्या व्यक्तीला सांगितले अण कोणतीही अडचण असल्यास बिनधास्त फोन करा, येऊन भेटा असेही सांगितले.

या सर्व घटनाक्रमात मात्र हुरडफुक्याच्या सर्व प्लॅनवर पाणी फिरले, ज्यांच्याकडून बदनामीची सुपा.. घेतली होती तेही चिडले अण मग सपातनी करण्यासाठी पुन्हा या हुरडफुक्याने आपल्या काम न देण्याऱ्या मेंदूने पुन्हा लिहून टिकेची झोड उठवली. मात्र ज्या व्यक्तीची क्लिप बनवून ती बदनामी करण्यासाठी सर्वत्र व्हायरल करण्यात आली होती ती क्लिप बेमालुमपणे बनवण्यात येऊन आपल्याला नाहक नको त्या गोष्टीत ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला असे खुद्द या व्यक्तीने आपल्या प्रतिक्रियेत म्हटल्याने हुरडफुक्याची अवस्था न घरका, ना घाटका अशी बनली आहे.

मात्र तरीही खाल्लेल्या तंदूर रोट्यांना जागणार नाही तो हुरडफुक्या कसला..? हुरडफुक्याने आपण कसे लेखणी बहाद्दर आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही नेत्यांबद्दल लिखानातून टिका करताना अगदीच नीच पातळीचे शब्द वापरायला सुरुवात केली आहे. काही झाले तरी थंड पॅक, दोन तंदूर रोट्या अण एक वाटी रस्सासाठी ‘आपण कुछ भी करेगा’ हे पुन्हा एकदा या हुरडफुक्याने सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. उद्या हा हुरडफुक्या पुन्हा काहीतरी विचित्र लिहून लोकांची करमणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र लोकही या हुरडफुक्याला सिरिअस न घेता त्याच्या लिखानाची टिंगल टवाळी करताना दिसत आहेत.