दौंड | विद्यार्थ्यांची कॉपी शिक्षकांना भोवली, 9 शिक्षकांवर कारवाई

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या 12वी च्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु असताना कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिबंध न केल्याने तब्बल 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  किसन दत्तोबा भुजबळ (विस्तार अधिकारी शिक्षण प्राथमिक विभाग पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27/2/2023 रोजी दुपारी 12ः15 च्या सुमारास केडगांव (ता.दौंड जि.पुणे) येथील जवाहरलाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वीचे केंद्र क्रमांक 193 वर फिर्यादी यांच्या भरारी पथकाने अचानक भेट दिली असता यातील 9 शिक्षक हे परिक्षा ही काॅपीमुक्त न करता, विद्यार्थ्यांना मासकाॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता, त्यांना काॅपी करणेसाठी उत्तेजन देवुन अप्रत्यक्षरित्या सहाय्य केले असल्याचे म्हटले आहे.

या सर्व 9 शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा 1982 ( महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे फिर्याद देण्यात आली असून यात 3 महिला शिक्षकांचा समावेश आहे.