कोणत्याही जाती-धर्माचा अवमान होईल असे कृत्य केल्यास कडक कारवाई : पोलीस निरीक्षक गोपाळ पवार

अख्तर काझी

दौंड : रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शहरात आनंदी वातावरणात साजरे व्हावेत, येथील भाईचारा-जातीय सलोखा सुद्धा अबाधित रहावा या साठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्व सण आनंदी वातावरणात साजरे करावेत, शहरात शांतता राखावी असे आवाहन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दौंडकरांना केले आहे.

सणासुदीच्या काळात दौंड शहर आणि परिसराची कायदा सुव्यवस्था बिघडवुन शहर अशांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी पवार यांच्याकडून देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी  आवाहन सर्व नागरिकांना आवाहन करताना कोणत्याही जाती, धर्माचा अवमान होईल असे स्टेटस आपल्या व्हाट्सअपवर ठेवू नका, वादग्रस्त कमेंट करू नका तसेच कोणतीही बेकायदेशीर पोस्ट करू नये, असा प्रकार होऊन शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितावर प्रचलित कायद्याने योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा त्यांनी दिला आहे.

आपल्या सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सामाजिक सलोखा व सार्वजनिक शांतता अबाधित राहील याची दक्षता घ्यावी असेही आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले आहे.