केडगाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी चुरशीने मतदान, अशी आहे सर्व ‘सहा’ वार्डमधील मतदानाची आकडेवारी

दौंड : दौंड तालुक्यातील 10 ग्रामपंचायततीची निवडणूक आज पार पडली. सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायततीपैकी केडगाव ही एक ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व सहा वार्डमधील मतदानाची टक्केवारी आणि आकडेवारीजाहीर करण्यात आली आहे.

मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे देशमुख मळा 1938 पैकी 1392, धुमळीचा मळा 2085 पैकी 1627, पाटील निंबाळकर वस्ती 2078 पैकी 1610, हंडाळवाडी 1412 पैकी 1162, केडगाव स्टेशन 3483 पैकी 2168, केडगाव गावठाण 2025 पैकी 1542 अश्या पद्धतीने मतदान झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

केडगावातील सहा ही वार्डमध्ये चुरशीने मतदान झाले असून सरपंचपदासाठी उभे असलेले तीन उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उभ्या असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी विजय आपलाच होईल असा दावा केला जात आहे. उद्या सकाळी 9:00 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी दिली आहे.