महाराष्ट्र शासनाच्या नावे काढण्यात आलेले ते परीपत्रक ‘खोटे’! सोशल मीडियावर परिपत्रक टाकणाऱ्यावर ‘गुन्हा’ दाखल होणार

अब्बास शेख

मुंबई : एस.टी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या/ होत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे दि.०७.०३.२०२२ या तारखेचे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (कर्मचारीवर्ग) यांच्या स्वाक्षरीने एक खोटे परिपत्रक समाजमाध्यमाव्दारे व्हायरल करण्यात येत आहे.
सदर परिपत्रक पुर्णतः खोटे व बनावट असून, कर्मचाऱ्यांमध्ये हेतूपुरस्सर संभ्रम निर्माण
करुन त्यांना आपल्या कर्तव्यावरून परावृत्त करण्याच्या गैर-उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समुहाने ते प्रदर्शित केले आहे. संबंधित अज्ञात व्यक्ती अथवा समुहावर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दि. १० मार्च २०२२ पर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानस नाही. याबाबत समाजमाध्यमात व्हायरल झालेले परिपत्रक खोटे असल्याचा खुलासा महामंडळाने केला आहे.

तसेच दि. १० मार्च, २०२२ पर्यंत हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात
कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानस नाही असे एसटी महामंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.