Categories: Previos News

एसटी संपाचा दौंडकरांनाही फटका, दौंड डेपोचे 180 कर्मचारी संपावर गेल्याने खाजगी वाहन चालकांकडून प्रवाश्यांची लूट!

दौंड : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे १८० कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सोमवारपासून दौंड आगाराच्या गाड्या संपामुळे आगाराच्या बाहेर न पडल्यामुळे दौंड मधून बाहेरगावी जाणाऱ्या व दौंड मध्ये येणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली.बारामती वरून दौंड मध्ये येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहनांनी प्रत्येकी दोनशे रुपये आकारले ची माहिती गोल राउंड येथे एका महिला प्रवाशाने दिली. बारामती ते दौंड एसटी चा दर साठ रुपये असा आहे बारामती वरून दोनशे रुपये खर्च करून आलेल्या महिलेने दौंड येथील गोल राऊंड येथील बस थांब्या पासून पुन्हा देऊळगाव राजे या त्यांच्या गावी जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर वरून त्यांच्या मुलाला दुचाकीवरून बोलावून घेतले होते.दौंड शहरातील नगर मोरी येथील मदर तेरेसा चौक व गोल राऊंड बस थांब्यावर अनेक प्रवासी ताटकळत उभे राहिल्याचे चित्र दिसत होते. एसटीच्या संपामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्याचे मात्र उखळ पांढरे होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान   एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी  बेमुदत संपावर  आहेत अशी माहिती, दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडुरंग काटे, अंकुश तुरे, प्रविण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम, जगन्नाथ खराडे, यांनी दिली.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे ३६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अशी कामगारानी विनंती केली आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले.

किसान मोर्चा भाजपा, मनसे,  दौंड  मेडिकल असोसिएशन,  बहुजन मुक्ती पार्टी,  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,  छत्रपती क्रांती सेना,  भारत मुक्ती मोर्चा,  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , वंचित बहुजन आघाडी, यांच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड आगारात येऊन कामगारांना मार्गदर्शन केले व संपास जाहीर पाठिंबा दिला.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

17 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

18 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

19 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago