दौंड-पुणे मार्गावर लाल परी (ST) ची संख्या वाढविण्याची दौंडमाशील प्रवाशांची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तरकाझी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार, नोकऱ्या गेल्या. नोकर वर्गामध्ये असंतोष वाढू लागला, ही  परिस्थिती समजून राज्य सरकारने ST सेवा सुरु केली. त्या अनुषंगाने दौंड, पुणे मार्गावर सुद्धा ST सुरू करण्यात आली. त्यामुळे दौंड हुन पुण्याला रोज कामाला जाणाऱ्यांची सोय झाली. दौंड वरून पुण्याला जाण्यासाठी सकाळच्या सत्रा मध्ये येथील डेपो ने दोन गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

मात्र मागील 2-3 दिवस डेपो सकाळी एकच गाडी उपलब्ध करून देत असल्याने दोन गाड्यातील प्रवाशांना एकाच ST ने प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे गाडीतील निम्म्या प्रवाशांना दौंड -पुणे प्रवास उभे राहुन करावा लागत आहे अशी माहिती प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे. मंगळवारी (दि.29) रोजी मात्र प्रवाशांनी येथील डेपो प्रशासनाला धारेवर धरीत या मार्गावर गाड्या वाढवून मिळाव्यात अशी मागणी केली आहे. 

दौंडकर प्रवाशांना हा त्रास वारंवार होत असून आमदार राहुल कुल यांनी या कामामध्ये लक्ष देऊन दौंड पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.