Sport – कटारिया करंडक क्रिकेट स्पर्धेचा आ.राहुल कुल यांच्या हस्ते शुभारंभ, क्रिकेटचा थरार पाहण्याची दौंडकरांना पर्वणी



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी) 

दौंडकर क्रिकेट रसिकांच्या अत्यंत पसंतीच्या कि. गु. कटारिया करंडक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते व गेली 24 वर्ष सातत्याने ही स्पर्धा आयोजित करणारे भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला. नगराध्यक्ष शितल कटारिया, गोविंद शेठ अग्रवाल, डॉ. एल. एस. बिडवे, सेंट्रल रेल्वे ज्युनियर इन्स्टिट्यूट चे पदाधिकारी संतोष पवार, संजय गवळी,राकेश तिकोने, एन नाडगौडा, के निरंजन, नाटेकर, आर  बी सिंग, निगम, रमेश सेठ कटारिया ,शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सोनवणे, संतोष जगताप, माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, भाजपाचे सुनील शर्मा, नगरसेवक राजेश गायकवाड, शहानवाज पठाण, जीवराज पवार, फिलीप अँथोनी, बाबा शेख,गणेश जगदाळे, नगरसेविका अरुण डहाळे तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

भीमथडी शिक्षण संस्था व सेंट्रल रेल्वे ज्युनियर इन्स्टिट्यूट आयोजित कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे हे 25 वे वर्ष आहे त्यामुळे यावर्षी क्रिकेट प्रेमींना क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या संघासाठी खेळणारे अनेक दिग्गज रणजीपटू या  स्पर्धेत सातत्याने आपला सहभाग नोंदवितात आणि आणि या  वर्षी सुद्धा तो असणार आहे त्यामुळे त्यांच्या जिगरबाज खेळाची पर्वणी पाहण्याची संधी दौंड करांना निश्चितच मिळणार असल्यामुळे क्रिकेट रसिकांचा प्रतिसादही पहिल्या  दिवसापासूनच पहायला मिळतो आहे. पुणे, सोलापूर, नगर, नेरूळ, गुलबर्गा या  शहरातील आठ दिग्गज संघाचा समावेश असलेली ही  स्पर्धा लिग- कम -नाकाऊट पद्धतीने खेळविली जाणार आहे.

दि.7 फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्याचा जल्लोष पाहण्यासाठी दौंडकर क्रिकेट प्रेमींनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया व  शे.जो. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक माधव बागल यांनी केले आहे. गेली 24 वर्ष आम्ही प्रेमसुख कटारिया व माधव बागल यांच्या मेहनतीमुळे पार पडत असणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहोत, या  स्पर्धेमुळे स्थानिक  खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळत आहे अशी प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमींनी यावेळी दिली.