Special 26 : नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात धक्कादायक खुलासे, समीर वानखेडेंची NCB कर्मचाऱ्याकडून पोलखोल..! की,

मुंबई : एनसीबी करत असलेल्या ड्रग्ज कारवाईवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून नवनवीन खुलासे केले जात असताना आता त्यांनी एक पत्र प्रसिद्ध करून मोठी खळबळ माजवून दिली आहे मोठा. या पत्रामध्ये 2021 साली तब्बल 26’ गुन्ह्यांचा उल्लेख असून हे सर्व गुन्हे प्रीप्लॅन केले गेल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाले असल्याचा दावा करून या पत्रामध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या करवायांबाबत धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी हे पत्र ट्विट करत या पत्रातील मजकूर जसा च्या तसा प्रसिद्ध केला आहे. या पत्रातील माहिती धक्कादायक असून जर माहितीमध्ये काही तथ्य असेल तर मात्र यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये खूपच धक्कादायक माहिती देण्यात आली असून या माहितीनुसार कश्या पद्धतीने बॉलिवूडच्या कलाकारांना व इतरांना टार्गेट करून कारवाया केल्या जातात याचा नावासह आणि गुन्ह्यांच्या दाखल्यांसाह उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पत्र पाठवणाऱ्याने आपण एनसीबी मध्ये काम करणारा एक सच्चा देशभक्त कर्मचारी असल्याने स्वतःचे नाव उघड करत नसल्याचे सांगितले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago