सरकारी जागेत अतिक्रमण केलेल्या शेतकरी जोडप्याला बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांकडून ‛जिल्हाधिकारी’ आणि ‛SP’ बडतर्फ



गुना (मध्यप्रदेश) : 

सध्या मध्य प्रदेशमध्ये सरकारी यंत्रनेविरुद्ध नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. याला कारणही तसेच असून या राज्यातील  गुनामध्ये पोलिसांनी एका शेतकरी जोडप्याला बेदम  मारहाण केली आहे. मारहाण करण्याचे कारण म्हणजे या जोडप्याची शेती जेथे होती ती जागा सरकारी होती असे सांगितले जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यास येथून हटवण्यासाठी त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर या जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे.

VIDEO 1

ही मारहाण करताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या जोडप्याला मारहाण करताना त्यांची मुलं घटनास्थळी उपस्थित होती आणि आई, वडिलांना मारताना पाहून मोठमोठ्याने रडताना व्हीडिओत दिसत होती. इतके गंभीर प्रकरण घडूनही प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची दया येत नव्हती तर ते निर्दयीपणे या शेतकरी जोडप्याला अमानुष मारहाण करतच होते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली हा व्हिडीओ आणि  घटनेची माहिती घेऊन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जिल्हाधिकारी (Collector) आणि पोलीस अधीक्षकांना (SP) पदावरून बडतर्फ केलं. जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन आणि एस.पी. तरूण नायक  अशी त्यांची नावे असून या दोघांना या मुख्य पदावरून हटवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची घोषणा केली.

VIDEO 2

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार गुना शहरातल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असून शहराच्या उप-विभागीय मॅजिस्ट्रेटच्या नेतृत्त्वाखालची एक टीम अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी गेली होती. राजकुमार अहिरवार असे येथे शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून  पोलिसांच्या पथकाने तेथे जात jcb च्या सहाय्याने येथील शेतीचे अतिक्रमण दूर करायला सुरुवात केली यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे.

घडलेल्या या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर कडाडून टीका केली करताना “हे शिवराज सरकार मध्य प्रदेशला कुठे घेऊन जातंय? हे जंगलराज आहे का? असा हल्लाबोल करून राजीनाम्याची मागणी केली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनीही व्हिडीओ ट्विट करून खाली ‛आमची लढाई याच विचारसरणी आणि अन्यायाच्या विरुद्ध आहे.

नागरिकांनी याबाबत वृत्तपत्र आणि वाहिन्यांना  माहिती देताना या जमीनीवर एका माजी खासदाराचा ताबा असून त्यांने ही जमीन राजकुमार अहिरवार यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कसायला दिल्याच म्हटलं आहे.

या जमिनीवर पीक घेण्यासाठी या शेतकऱ्याने सुमारे 2 लाख रुपये खर्च केले होते. ही रक्कम त्याने कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केली होती. त्याने केलेल्या पेरणीतून त्याचा उदरनिर्वाह चालणार होता मात्र हे सर्व उध्वस्त करण्यात आल्याने या दाम्पत्याने विषप्राशन केले मात्र यानंतरही प्रशासन जागे झाले नाही. सर्वांसमोर विष घेऊनही त्यांची मदत प्रशासनातील कुणी करत नव्हते तर त्यांची मुलं त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही घटना घडली त्यावेळी राजकुमार यांचा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर त्यालाही पोलीस पथकाने मारहाण केली तसेच जे लोक तेथे उपस्थित होते त्यांच्यासह सर्वांवर गुन्हेही दाखल केले.