1 हजार 50 कोटी अजित पवारांच्या खात्यातून परिवारात ट्रान्सफर, हा माझा पहिला फटाका – किरीट सोमय्या

मुंबई – मी दिवाळी नंतर घोटाळ्याचे फटाके फोडणार होतो पण शरद पवारांना घाई झालेली आहे त्यामुळे बीजेपी च्या नेत्यांवर त्यांचे लोक बेछूट आरोप करत सुटले आहेत त्यामुळे दिवाळीच्या सुरवातीलाच मी फटाके फोडत असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जरांडेश्वर कारखान्याच्या बाबतीत गंभीर आरोप केले आहेत.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलताना मी 3 मंत्री आणी 3 जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते, त्यातील पहिले जावई म्हणजे पवार परिवाराचे जावई असून अजित पवारांचे मेहुणे मोहन पाटील हे असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले, कसे आले व कुठे गेले याबाबत मोठा खुलासा केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आरोप करताना अजित पवारांच्या कंपनीत त्यांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अनेक बिल्डरांकडून आले मात्र ते परत दिले गेले नाहीत तर ते पैसे बहिणीचे पती, बहीण, पत्नी, मुलगा पार्थ आणि त्यांच्या आई यांच्या खात्यात पाठवण्यात आले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांच्याही खात्यात लाखो, कोटी रुपये आले पण माघारी गेले नाहीत असे म्हणत हीच तर पवार, ठाकरे यांची खासियत आहे असे त्यांनी म्हटले आहे.


अजित पवारांच्या खात्यात आलेला हा सर्व पैसा त्यांनी परिवारातील लोकांच्या खात्यात ट्रान्स्फर केला असून गेल्या 19 दिवसांत जी छापेमारी झाली त्यात हे सर्व समोर आले असून आम्ही हा सर्व सातबारा पवारांच्या हातात दिला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स आणि नंतर ईडी ने जी छापेमारी केली त्यामध्ये जे बाहेर येत आहे ते दडपण्यासाठी यांनी नावब मलिक-वानखेडे हा सामना सुरू केल्याचे म्हटले आहे. इतके वर्ष नावब मलिक गप्प बसले आणि नंतर त्यांनी हे सर्व आत्ताच बाहेर काढण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला आहे. अजित पवारांच्या दाजींच्या खात्यामध्ये 1 हजार 50 कोटी कुठून आले आणि कुठे गेले याचे अगोदर उत्तर द्या, हा पहिला फटाका आहे असे किरीट सोमय्या यांनी शेवटी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago