दौंड : दौंड तालुक्यातील सन 2021- 22 या आर्थिक हंगामातील 80 टक्के पेक्षा वसूली कमी असणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांची वसुली आढावा बैठक जिल्हा निबंधक मिलिंद सोबळे, पी.डी.सी.सी.बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे, पी.डी.सी.सी. बँकेचे मा. चेअरमन रमेश थोरात, कार्यकारी संचालक चव्हाण,तालुका उपनिबंधक तावरे व तालुका विभागीय अधिकारी निलेश थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
थकीत सभासदांची 101(1)अन्वये कारवाई करण्यासाठी प्रकरणे दाखल करणे,
101चे दाखले असणाऱ्या सभासदांवर पुढील कारवाई करून वसुली प्रक्रिया चालू करणे,
संस्थेचे संचालक मंडळ यांना थकबाकीदार सभासदांची वसुलीची जबाबदारी देणे, असे निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत.
तसेच वसुलीची कारवाई जलद गतीने राबवण्यासाठी वसुली अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
या सभेमध्ये शाखेचे विकास अधिकारी, संस्थेचे चेअरमन व सचिव यांचा सोबळे यांनी वैयक्तिक आढावा घेतला तसेच बँकेचे नूतन व्हा.चेअरमन व संचालक यांची निवड झाल्या निमित्ताने बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला .