Social – शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‛दिपगृह’कडून स्वतःच्या शाळेतच शिक्षणाची व्यवस्था



दौंड : सहकारनामा

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रात शाळाबाह्य, वंचित, शोषित, दुर्बल घटकाकरीता बालरक्षक चळवळ सुरू झाली असून चौफुला (ता.दौंड) येथील दीपगृह अकॅडमी या शाळेने तेथील वीटभट्टीवर स्थलांतरित कुंटूबातील १० शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आठवड्यातील २ दिवस प्रत्यक्ष वीटभट्टीवर जाऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले आहे.

शाळेच्या शिक्षिका शबनम डफेदार यांनी यात सक्रिय सहभाग घेतला शाळेच्या मुख्य संचालिका आश्लेषा मॅडम यांच्या प्रेरणेतून ऍडमिन अबिदा मॅथ्यू मॅडम यांनी शाळेतर्फे या मुलांना २६ जानेवारी रोजी खाऊवाटप करत या सर्व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दीपगृह अकॅडमी या संस्थेकडून घेण्यात आली आहे.

२६ जानेवारी या दिवशीच लगेच शाळेतील बालरक्षक शबनम डफेदार व सुनिता मॅडम यांनी शाळेसभोवती असणाऱ्या वीटभट्टीवरील स्थलांतरित कुटुंबातील शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे केला आहे. यात एकूण २२ मुलांचे शिक्षण, त्यांचा थांबलेला शिक्षण प्रवास पुन्हा नव्याने सुरू व्हावा यासाठी स्वतः पुढाकार घेऊन रोज २ ते ३ तास या मुलांनाच नव्हे तर शाळेसभोवतील सर्व वीटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्था केली आहे. 

याची सुरुवात आज दिनांक २७ जानेवारी पासून सुरू झाली असून आज १६ शाळाबाह्य मुले शाळेत उपस्थित झाली होती हे विशेष. दीपगृह अकॅडमी ही इंग्रजी माध्यमाची शाळा असुन देखील या शाळेने  वीटभट्टीवरील या शाळाबाह्य मुलांचा थांबलेला शिक्षण प्रवास पुन्हा नव्याने सुरू केला आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे हे कार्य कौतुकास्पद आहे. 

संपूर्ण बालरक्षक महाराष्ट्र परिवार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालरक्षक विनोद राठोड यांनी या शाळेचे कौतुक करताना दीपगृह ऍकॅडमी इंग्लिश मेडियम स्कूल ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शाळा आहे जी शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असल्याचे व गरीब, वंचित, दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी नेहमीच विविध उपक्रम राबवित असल्याचे म्हटले आहे.