Social – दौंडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू, प्रशासनावरील ताण कमी करण्याचा एक कौतुकास्पद प्रयत्न



| सहकारनामा |

दौंड : अख्तर काझी

शहर व परिसरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. खाजगी तसेच सरकारी दवाखान्या मधील बेड फुल्ल झालेले आहेत, प्रशासनाने सुरु केलेले कोविड सेंटर वाढत्या रुग्णां मुळे अपुरे पडत आहेत, अशी परिस्थिती पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत  शासनाच्या परवानगीने 100 खाटांचे कोविड सेंटर सुरू करून प्रशासनावरील ताण थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील गुजराती भवन येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

येथे विलगीकरणा साठी येणाऱ्या रुग्णांच्या जेवणाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डॉ. डांगे यांनी यावेळी सांगितले. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तुटवडा जाणवणाऱ्या ऑक्सिजन च्या उपलब्धते साठीही असेच सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करावे असे आवाहनही डॉ. संग्राम डांगे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी, प्रशांत पवार,रामेश्वर मंत्री, सुशील शहा,स्वप्निल शहा, मनोज अग्रवाल,धरम लुंड,रोहन जोगळेकर, प्रमोद पवार, बाळकृष्ण कौलगी,योगेश कोळसे, महेश  राजोपाध्ये, सचिन गोलांडे, सचिन कुलथे, यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटर साठी शिवजी भाई पोकार आणि कुटुंबीयांनी  स्वतःच्या मालकीचे गुजराती भवन मोफत उपलब्ध करून दिले आहे. 

शहर व परिसरातील मंगल कार्यालयाच्या मालकांची मदत घेत अशाच प्रकारची कोविड सेंटर्स आणखीन सुरू केली पाहिजेत अशी मागणी रुग्णांच्या नातलगांकडून होत आहे.