social work – मृत कोरोना रुग्णाच्या अस्थींना कोणी वाली नाही! ग्रामपंचायत सदस्यांनी हातांनी अस्थी वेचून केले विसर्जन



| सहकारनामा |

दौंड : केडगाव ता.दौंड येथील स्टेशन स्मशानभूमी मध्ये करोनामुळे मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर आठ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र या मृतांवर अंत्यसंस्कार होऊन आठ दिवस उलटले तरीही या ठिकाणी या मृतांचे नातेवाईक सावडण्यासाठी (अस्थी गोळा करण्यासाठी) रुग्णांचे कोणीही आले नाहीत. 

त्यामुळे स्थानिक नागरिकांना मृत्यू झालेल्या अन्य मृतदेहांवर अंत्यविधी करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या.

कारन या ठिकाणी असणाऱ्या शवदाहीनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू आलेल्या मृतांच्या अस्थी तशाच असल्याने नवीन मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे नाईलाजाने या मृतदेहांवर केडगाव गावठाण येथील नवनाथ महाराज पहाडा शेजारील दुसऱ्या स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करावे लागत होते.  

ग्रामस्थांची हि अडचण ध्यानात घेऊन केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ आणि नितीन जगताप या दोन्ही सदस्यांनी पुढाकार घेऊन या मृतदेहांच्या अस्थी सावडण्याचा विधी पूर्ण करून त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या आणि येथील स्मशानभूमी स्वतः हाताने स्वच्छ करून ग्रामस्थांची अडचणीतून सुटका केली आहे.