|सहकारनामा|
दौंड : संपूर्ण जगाला समतेचा संदेश देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्ताने दौंड मध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये 188 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली पैकी 35 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील बुधरानी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक बादशहा शेख, वसीम शेख, अनिल साळवे, नितीन कांबळे तसेच गोविंद अग्रवाल, मोहन पडवळकर,शौकत सय्यद, संजय जगताप, अमोल सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रेमसुख कटारिया व आयोजक अनिकेत मिसाळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सुवर्णयुग मित्र मंडळ, लॉक डाऊन क्रिकेट क्लब व अनिकेत भाऊ मिसाळ युवा मंच च्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोहन ओहोळ, शुभम ढाळे, अक्षय मिसाळ, अविनाश धुमाळ, प्रतीक वाघमारे, सिद्धेश कांबळे, ओंकार चव्हाण, सचिन साळवे, सनी बनसोडे, योगेश चेटीयार, अझर शेख, प्रवीण अस्वरे, अमोल दिघे, नितीन लोंढे,चांद शेख, साहिल पोळ,सागर तारू आदींचे सहकार्य लाभले.