Social Work – पुरंदर नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

|सहकारनामा|

दौंड : यवत येथे असलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थाचे व्यवस्थापक सुनील शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त पडवी, माळवाडी ता. दौंड या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्ष संवर्धनासाठी 5 हजार रुपयांची रक्कम माळवाडी येथील महात्मा फुले प्रतिष्ठान यांना देण्यात आली.

प्रत्येकाला आपल्या वाढदिवसानिमित्त काही ना काही चांगला उपक्रम राबवावा अशी इच्छा असते. काहीजण आपल्या मित्र आणि नातेवाईकांना जेवणाचा बेत करतात तर काहीजण आपापल्या परीने सामाजिक कार्यात काही ना काही रक्कम देऊन आपनही समाजाचे काही देणे लागतो हि भावना जोपासतात.

अशीच समाजोपयोगी आणि निसर्गाच्या प्रति प्रेम भावना ठेवणारे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील शितोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याची इच्छा जाहीर केली आणि त्यांच्या मित्र परिवारानेही त्यांना यात सहकार्य करत वृक्षारोपण करण्यास मदत केली. या उपक्रमासाठी युवा सामाजिक कार्यकर्त्यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले तसेच हा उपक्रम राबवताना पडवी ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच भाऊसो बारवकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महादेव कुदळे सर, मा.ग्रामपंचायत सदस्य बाळासो निंबाळकर,  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश निंबाळकर व इतर युवा सहकारी आवर्जून उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago