Categories: Previos News

Social Work – दौंड मधील ॲशवूड मेमोरियल हॉस्पिटल मध्ये मोफत प्रसूती सेवा, महिला वर्गामध्ये समाधान



| सहकारनामा |

दौंड: शहर व परिसरामध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी गच्च भरलेले आहे. सहकार्याच्या भावनेने रुग्णालय प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना येथे उपचारासाठी दाखल करून घेतले आहे, येथील सर्व खाटा बाधित रुग्णांकरिता वापरण्यात येत असल्याने या रुग्णालयामध्ये इतर आजारा च्या उपचारासाठी येणाऱ्या सामान्य रुग्णांची मोठी अडचण झाली होती. 

अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील प्रसूती करिता दाखल होणाऱ्या महिलांना प्रसूती व प्रसूती पश्चात सर्व उपचार व सेवा शहरातील मिशन दवाखाना येथे मोफत देण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व गरजू महिलांनी घ्यावा तसेच उपचारा संदर्भात काही तक्रार असल्यास ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, दौंड मर्चंट असो.चे अध्यक्ष राजेश पाटील,तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत धनवे व निखिल स्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

येथे मिळणाऱ्या सेवे मध्ये प्रसूती, औषधे, भोजन व सर्व प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे. वाढत्या कोरोना रुग्णां मुळे उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती करिता येणाऱ्या गरजू महिलांना उपचारासाठी दाखल करणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक होते, त्यामुळे त्यांना येथे दाखल करता येत नव्हते.

त्यामुळे न परवडणाऱ्या खाजगी दवाखान्यात न जाता उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय झाली होती. गरजू महिलांच्या उपचाराचा विचार करीत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे महिलांनी स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago