Categories: सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘न्यू अंबिका’ सांस्कृतिक कला केंद्राकडून ‘नाताळ’ उत्साहात साजरा

दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला, वाखारी येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र हे सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून या सांस्कृतिक कला केंद्रामध्ये प्रत्येक जाती-धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मियांचे गणपती, दिवाळी, वारकरी सेवा, मुस्लिम धर्मियांची न्याज, कंदुरी, ईद तसेच ख्रिस्ती बांधवांचा नाताळ इत्यादी सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

सुरुवातीपासूनच आपली ‘सर्व धर्म समभाव’ ही सामाजिक ओळख या सांस्कृतिक कला केंद्राचे मालक अशोकबाबा जाधव हे जपत आले आहेत. त्याच धर्तीवर परवा ‘नाताळ’ चा सणही येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्त न्यू अंबिका कला केंद्राच्या आवारात ‘ख्रिसमस ट्री’ उभारण्यात आला होता. या ‘ख्रिसमस ट्री’ ला आकर्षक विद्युत रोषणाईने मढविण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य थिएटर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अशोकबाबा जाधव तसेच या संस्कृतिक कला केंद्राच्या संचालिका जयश्रीताई जाधव यांसह या कला केंद्रातील लावणी कलावंत आणि नर्तीकांनी दीप प्रज्वलन आणि मेणबत्त्या लावून ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago