हजरत राजा बागसवार यांच्या ‘उरुसा’ निमित्त दौंडमध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

दौंड : हजरत राजा बागसवार दर्गा उरूस (कुंभार गल्ली) निमित्ताने येथील शेर ए हिंद सोशल क्लब व परिसरातील मित्रमंडळाच्या वतीने नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मा.नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरास गरजू रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला, एकूण 55 रुग्णांची शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. यापैकी 15 जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एकता विकास चारिटेबल ट्रस्ट व पुणे येथील बुद्रानी हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बाबांच्या उरुसाच्या निमित्ताने दिनांक 28, 29, 30 मार्च रोजी धार्मिक कार्यक्रमांचे ( संदल, उरूस व जियारत)आयोजन करण्यात आले तसेच अन्नदानाचा उपक्रमही राबविण्यात आला.