Categories: आरोग्य

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व लसीकरण मोहिमेचे आयोजन

दौंड : जागतिक अपंग दिनानिमित्त दौंड प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम उपक्रम राबविण्यात आले. शिबिरामध्ये 250 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 300 जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नगराध्यक्षा शितल कटारिया, नगरसेवक इंद्रजीत जगदाळे व ऍड अरुणा डहाळे तसेच शहरातील सर्व बँकांचे अधिकारी व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अपंगांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटना नेहमीच अग्रेसर असते तसेच इतर सामाजिक उपक्रमात सुद्धा संघटनेचा नेहमी सहभाग असतो. संपूर्ण तालुक्यातील अपंगांसाठी संघटनेने लसीकरण उपक्रम राबविला आहे, आत्तापर्यंत संघटनेने 1500 लोकांचे लसीकरण केले आहे.
आरोग्य तपासणी शिबिरास स्पार्क मिंडा फाउंडेशन व येथील उपजिल्हा रुग्णालयातील सहाय्यक नेत्रचिकित्सक अधिकारी विठ्ठल शेंडकर, टॉमसन शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच दोन्ही उपक्रम राबविताना गुजराती कोविड सेंटरचे ऍड अमोल काळे, निखिल स्वामी, सचिन कुलथे, राजू गजधने यांचे सहकार्य लाभले.

प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष दिवेकर, मनीषा पाचपुते,शहनाज शेख, कलीम तांबोळी, राजू मुलानी, बापू कोपनर,अशोक पाचपुते, सुरेश लवंगे यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago