| सहकारनामा |
दौंड : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केडगाव (ता. दौंड) येथील शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने केडगाव येथिल जवाहरलाल विद्यालय येथे असणाऱ्या कोविड सेंटरला सुमारे 21 हजार 500 रुपयांची औषधे (मेडिसिन) भेट देण्यात आली.
यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सध्या राज्यात सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका या महामारीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती सध्या दौंड तालुक्यात पाहायला मिळत असून तालुक्यात विविध कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्ण भरती असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र अनेक कोविड सेंटरमध्ये अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि अशा रुग्णांना शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोफत देण्यात आलेली औषधे हि संजीवनीचे काम करतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.