Social Work : मुस्लिम बांधवांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‛केडगाव कोविड सेंटर’ला चिकन बिर्याणी चे भोजन



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यात कोरोनाने आपले जाळे पसरविल्यानंतर तालुक्यामध्ये हॉस्पिटल आणि कोविड सेंटर कमी पडू लागले होते हि गरज लक्षात घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल आणि भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्या मागणीनुसार केडगाव कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

या कोविड सेंटरमध्ये जवळपास 60 ते 70 रुग्ण हे कायम दाखल असतात. या रुग्णांना सामाजिक बांधीलकीतून अनेक स्वयंसेवक आपापल्या परीने नाश्ता, भोजन, औषधे, फळे देत असतात. अशीच सामाजिक बांधिलकी जपत केडगाव येथील मुस्लिम समाजातील युवकांनी या कोविड सेंटरमधील 55 रुग्ण आणि 7 मेडिकल स्टाफला चिकन बिर्याणीचे जेवण देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.



केडगाव कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करणारे धनराज मासाळ यांनी यावेळी मुस्लिम बांधवांचे आभार मानले.

हा भोजन देण्याचा उपक्रम केडगाव मुस्लिम जमातीचे अब्बासभाई शेख, रज्जाकभाई इनामदार, असिफभाई शेख, अझहरभाई इनामदार, मेहबूबभाई शेख (पाटसकर), दस्तगीरभाई खान, शहर पोलीस इसाकभाई पठाण, बशीरभाई खान यांच्या माध्यमातून राबविण्यात आला तर उपक्रमात विशेष सहकार्य साहिल केटरर्स चे प्रोप्रायटर मुबारक पठाण  यांनी केले.