Categories: सामाजिक

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त दौंड मधील स्वातंत्र सैनिकांचा सन्मान, 500 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तरांचे वाटप

दौंड : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधित येथील न्यू महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा विकास दल संस्थेच्या वतीने व अध्यक्ष नागसेन धेंडे यांच्या पुढाकाराने दौंड मधील स्वातंत्र्यसैनिक मा. आमदार,स्व. जगन्नाथ पाटसकर यांना मरणोत्तर दौंड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिक विष्णुपंत कुलकर्णी( दौंड भूषण), राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू अस्थिरोग तज्ञ डॉ.रोहन खवटे यांचा उत्कृष्ट धावपटू पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दौंड चे तहसीलदार संजय पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून दौंड भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास रा. रा. पो. द. गट क्र. 5 च्या समादेशक विनिता साहू, पोलीस निरीक्षक विनोद घुगे,मा. उपनगराध्यक्ष चारुशीला धेंडे, संत तुकडोजी संस्थेचे सचिव सुभाष ढावरे, मुख्याध्यापक अनिल धामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजकांच्या वतीने संत तुकडोजी महाविद्यालयातील 101 विद्यार्थ्यांसह शहरातील विविध शाळेतील 500 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तरांचे वाटप करण्यात आले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

12 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

21 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

3 दिवस ago