Social – स्वच्छतेसाठी कु. स्नेहल काळभोर या युवा सरपंचांनी हातात घेतली झाडू



दौंड : सहकारनामा

कीर्तनातून शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून प्रबोधन करणारे संत गाडगे महाराज (संत गाडगे बाबा) यांच्या जयंती निमित्त खडकी येथील नव निर्वाचित युवा सरपंच कु. स्नेहल संजय काळभोर यांनी हातात झाडू घेऊन स्मशान भूमी साफ करत युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त खडकी ग्रामपंचायतीतर्फे स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमीत साफसफाई करण्यात आली.

यावेळी  युवा सरपंच कु.स्नेहल काळभोर, संजय बापू काळभोर मा सदस्य जि.प. विकास काळे, राहुल काळभोर आणि ग्रामपंचायतीचे सर्व कामगार बांधव उपस्थित होते. 

युवा सरपंचांनी वडिलांसोबत झाडू हातात घेऊन ग्राम स्वच्छता अभियान सुरू केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.