Social – माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दौंड नगर परिषदेच्या वतीने मुस्लिम दफन भूमीमध्ये वृक्षारोपण



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने दौंड नगर परिषदेच्या वतीने येथील मुस्लिम दफन भूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक प्रजातीची, नारळ व इतर फुलझाडे अशा एकूण 325 वृक्षाची लागवड यावेळी करण्यात आली.

जास्तीत जास्त स्थानिक प्रजातीची वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे, शहरात हरित पट्टे विकसित करणे तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे या उद्देशाने नगर परिषदेने सदरचे अभियान राबविले असल्याची माहिती न. पा. च्या अधिकारी स्मिता म्हस्के यांनी यावेळी दिली. या प्रसंगी आलमगीर मशिदीचे मौलाना मोहम्मद नासिर रजा, मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार, न. पा. चे अभियंता मोमीन शेख, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे, राजेश गायकवाड, राजेश जाधव, वसीम शेख, सोहेल खान, अनिल सोनवणे, आबा वाघमारे, नागसेन धेंडे, अमोल काळे, फिलीप अँथोनी, निलेश सावंत, प्रशांत  धनवे, इस्माईल शेख, संजय बारवकर, अल्ताफ सय्यद, मोहसीन बागवान, अफजल पानसरे, राजू गोलांडे, जितू मगर,मन्नान इनामदार तसेच नगरपालिका आरोग्य विभागाचे निरीक्षक शाहू पाटील, शुभम चौकटे व कर्मचारी आदी उपस्थित होते. 

कब्रस्तान कमिटीचे प्रमुख कुमेल कुरेशी, राजू सय्यद, जहूर शेख, मुसा शेख, सईदू शेख यांनी येथील वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.