– सहकारनामा
दौंड : (अख्तर काझी)
संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर दौंड मधील सर्व भीमसैनिक व बहुजन बांधवांनी एकत्र येत महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा शितल कटारिया, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 7 चे समादेशक श्रीकांत पाठक, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ व पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, वासुदेव काळे यांच्या सह शहरातील सर्वच पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.
शिबिरास युवकांनी मोठा प्रतिसाद दिला,148 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. दौंड रोटरी ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक हडपसर, व पुना ब्लड बँक यांनी रक्त संकलन करून शिबिरास सहकार्य केले.