Social – चौफुला येथे पार पडला अँबुलन्सचा लोकार्पण सोहळा



|सहकारनामा|

दौंड : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्व.तुकाराम खंडुआण्णा धायगुडे साहेब व सविताताई तुकाराम धायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर, गोशाळेस चारा वाटप, वृक्षारोपण, ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका (अँबुलन्स) चे  लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले. 

यावेळी माजी.आ.रमेशआप्पा थोरात, कांचंनताई कुल, आनंददादा थोरात, भाऊसाहेब करे, वासुदेव नाना काळे या मान्यवर व स्व.साहेबांचे सहकारी बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री केसकर राजेंद्र, जयवंत पोळ इ सर्वांच्या बहुसंख्य लोकउपस्तीथीत पार पडला.

यामध्ये 252 रुग्णांनी आपल्या आरोग्यच्या विविध तपासण्यासाठी व 46 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन स्व.तुकाराम खंडूआण्णा धायगुडे साहेब स्मृती फाऊंडेशन यांनी केले होते.

ज्या रुग्णांना गरज असेल त्यांनी अँबुलन्स सेवेसाठी फाऊंडेशन ला संपर्क करावा असे अहवान देखील केलेले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश गडधे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विश्वराज हॉस्पिटल,रोटरी ब्लड बँक दौंड,कैलास आबा शेलार यांचे सहकार्य लाभले.