Categories: क्राईम

‘व्याजाच्या’ पैशासाठी ‘केडगावच्या’ व्यापाऱ्यास 6 जणांकडून मारहाण! सर्वांवर ‘खाजगी सावकारकी’, मारहाणीचा गुन्हा दाखल

दौंड / केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव या मुख्य बाजारपेठेतील एका व्यापाऱ्यास व्याजाच्या पैशांवरून खाजगी सावकारांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अक्षय भालचंद शतानी (रा.केडगाव, ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.


शतानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०१९ ते २०२२ पर्यंत वेळोवेळी आरोपी संतोष शिवाजी बनसोडे (रा.खोपोडी, ता.दौंड पुणे) बालाजी विठ्ठल ननवरे (रा.दापोडी ता.दौंड ) पांडुरंग कड (रा.केडगाव स्टेशन, ता.दौंड ) सुरज तात्या दोरगे व तात्या दोरगे (रा.यवत ता.दौंड ) आणि दादा टिळेकर (रा.उरुळी कांचन ता हवेली जि पुणे) या सर्वांनी आपापली व्याजापोटी असलेली रक्कम मागून वरील ६ जनांनी फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण करून
व शिविगाळ दमदाटी करून व्याजाची
रक्कम दे नाहितर तुला व तुझ्या घरच्यांना
जिवे मारून टाकुन देईल अशी धमकी
दिली.

तसेच दिनांक ०८/०३/२०२२ रोजी फिर्यादीचे वडील भालचंद शतानी यांना सुरज दोरगे याने त्याच्या लाल रंगाच्या गाडीमध्ये टाकून केडगाव स्टेशन ता.दौंड येथुन सुरज दोरगे, बालाजी ननवरे, संतोष बनसोडे, पांडुरंग कड यांनी शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी
दिली होती त्यानंतर त्यांना लोणीकाळभोर येथील राजेंद्र हॉटेल समोर सोडुन ते निघुन गेले होते. दोन्ही पिता पुत्रास व्याजाच्या पैशावरून मारहाण, दमदाटी करने व खाजगी सावकारकी करने या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि.नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago