दौंड मध्ये श्रीराम नवमी जल्लोषात साजरी, सामाजिक उपक्रमांचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : सालाबाद प्रमाणे या वर्षीही भक्तांनी शहरामध्ये श्रीराम नवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. सकल हिंदू समाज (श्रीराम नवमी उत्सव समिती), हिंदू खाटीक समाज, वाल्मीक समाज तसेच राम राज्य ग्रुप व सरपंच वस्ती, भवानीनगर येथील भक्तांनी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले. सकल हिंदू समाज व हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीने शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

हिंदू खाटीक समाज बांधवांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये येथील मुस्लिम बांधवही सहभागी होते. शोभा यात्रेमध्ये  श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. पोलीस स्टेशन समोरील साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

त्याचप्रमाणे सरपंच वस्ती व भवानीनगर परिसरातील भक्तांच्या वतीने सुद्धा अन्नदानाचा उपक्रम राबविला, श्रीरामाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भक्त सहभागी होते.