Categories: क्राईम

धक्कादायक : ‛शिरूर’ च्या ‛महाराष्ट्र बँकेवर’ दिवसा ‛दरोडा’, कोट्यावधींचे सोने, रक्कम लंपास

पुणे / शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या पिंपरखे येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दिवसाढवळ्या धाडसी दरोडा टाकून कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
हि घटना आज दि.21 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला असून बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेवर दरोडा पडल्यानंतर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला याबाबत माहिती पाठविण्यात आली आहे.
पिंपर खेड हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा टाकणारे 5 ते 6 दरोडेखोर असून ते साधारण 25 ते 30 वयोगटातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील बोललं जात आहे. दरोडेखोरांनी जीन्स पॅन्ट, जर्किन, कानटोपी, चष्मा परिधान केले होते. ते हे सिल्वर कलरच्या मारुती सियाझ गाडीतून अहमदनगर दिशेने सुसाट वेगात पळून गेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या गादीवर पुढे प्रेस लिहिलेले आहे. या वर्णाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पहा व्हिडीओ Cctv Footage : शिरूरच्या महाराष्ट्र बँकेवर दरोडा – Shirur Bank of Maharashtra Big Robbery

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

15 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

17 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

19 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago