धक्कादायक – पुण्याच्या रावेर येथे होर्डिंग कोसळून 5 जण ठार

पुणे : पुण्याच्या रावेर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रावेर (पिंपरी चिंचवड) येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 5 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असताना रावेर येथे हे होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली अनेकजण सापडले होते. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

या अगोदर पुण्यात 2018 साली होर्डिंग कोसळून सुमारे 4 जणांचा मृत्यू झाला होता. होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अधिक वृत्त थोड्याच वेळात…