दौंड : दौंड तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पहायला मिळत आहे. भाजप चे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी चे माजी आमदार रमेश थोरात यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या कामाच्या कार्यपद्धतीकडे आकर्षित होऊन राष्ट्रवादी चे अनेक दिग्गज कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.
जिरेगाव, ता. दौंड येथील सरपंच भरत खोमणे, उपसरपंच सौ. सुनंदा भंडलकर, बाळकृष्ण लाळगे, तंटामुक्ती समितीचे बापूराव लोणकर, कृष्णा भंडलकर, युवराज खोमणे, माजी उपसरपंच त्रिंबक भंडलकर, माजी ग्रा. प. सदस्य रमेश भंडलकर, महेंद्र खंडाळे यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. कुल यांनी सर्वांचे स्वागत केले. गावाच्या विकासाच्या साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
पक्षप्रवेशावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हरीश्चंद्र ठोंबरे, भीमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवन, संपत आटोळे, अरुण आटोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.