दौंड : गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना घेऊन दौंड तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आज वाटलुज, मलठण, मुगाव ज्योतिबानगर येथे शिवसेना शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना घेऊन दौंड तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येऊन विविध गावांमध्ये शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी पासलकर यांनी बोलताना, शाखेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या शिवसैनिक व पदाधिकारी यांनी सोडवल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने राज्य सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम शाखेतील पदाधिकारी यांनी करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी केले.
या वेळी अनेक शेतकरी, महिला, तरूण व युवकांनी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी पक्षात स्वागत केले व सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख देविदास दिवेकर, महिला तालुका संघटक छाया जगताप, स्वाती ढमाले, शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, महिला विभाग संघटक ललिता डाळिंबे, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, विभाग प्रमुख काका परदेशी, अभिजीत डाळिंबे, हनुमंत निगडे, उप विभाग प्रमुख संजय आटोळे, शिवाजी साळुंखे, राहुल फडके, शाखाप्रमुख आबासाहेब देवकाते, नानासाहेब कांबळे, नानासो भांडवलकर, संजय पासलकर शिवसेनेचे शिवाजी शितोळे, प्रशांत जगताप, शंकर ठोंबरे, पप्पू पासलकर व इतर शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.