दौंड : कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली त्याला प्रत्युत्तर म्हणून दौंड राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष प्रशांत धनवे यांच्या पुढाकाराने पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील शिवरायांच्या स्मारकास जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी पक्षाचे नगरसेवक राजेश जाधव, वसीम शेख, राजेश गायकवाड तसेच वैशाली धगाटे, राणीताई भांगे, उमा भूमकर, निखिल स्वामी, संदिपान वाघमोडे ,अफजल पानसरे, दीपक सोनवणे, रुपेश व्हकांडे, सचिन धोत्रे आदी. उपस्थित होते. भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकां वर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.