Categories: Previos News

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” केडगाव शहर प्रमुखपदी आशिष गायकवाड यांची नियुक्ती

केडगाव / दौंड : केडगाव येथील आशिष गायकवाड यांची “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” केडगाव शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशराव पासलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांची शिकवण , पक्षाचा प्रसार व प्रचार तसेच पक्ष संघटन मजबुत करण्याची जबाबदारी आशिष गायकवाड यांच्यावर यावेळी पक्ष धुरीणांनी सोपवली.
आशिष गायकवाड म्हणाले की, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्षाचे माध्यमातून शहरप्रमुख म्हणून पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीमुळे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेशराव पासलकर यांच्या नेतृत्वाखाली केडगाव शहरप्रमुख या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापुढे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांचे प्रेरणेतून युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने संपूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेशराव पासलकर यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यात पक्षाची वाटचाल वेगाने होत असून,जनतेला न्याय देण्यासाठी गाव तिथे शाखा हि संकल्पना घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे.

यावेळी अनेक शेतकरी, सुशिक्षित तरुणांनी जिल्हाप्रमुख महेशराव पासलकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचे महेशराव पासलकर यांनी पक्षात स्वागत केले. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमंत निगडे, विजयसिंह चव्हाण, उप विभागप्रमुख राहुल फडके, शिवसेना शाखाप्रमुख आबासाहेब देवकाते, नानासाहेब कांबळे, दिपक धायगुडे, शिवसेनेचे शंकर शितोळे, दत्तात्रय चव्हाण, शुभम माळवे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago