Shiv sena Social Work – शिवसेनेच्या सहकार्याने दौंड मध्ये 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू



| सहकारनामा |

दौंड : (अख्तर काझी)

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या, प्रशासनावरील वाढत चाललेला ताण लक्षात घेऊन व आपणही समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने व रुपेश बंड यांच्या पुढाकाराने तसेच दौंड शिवसेना पक्षाच्या सहकार्याने येथील संत तुकडोजी महाराज विद्यालयामध्ये 50 खाटांचे शिव जनसेवा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

शहरातील ख्यातनाम डॉक्टर सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, लिंगाळी गावचे सरपंच सुनील जगदाळे, विद्यालयाचे सचिव डावरे, मुख्याध्यापक गुणवरे, संतोष जगताप, रुपेश कटारिया,अशपाक सय्यद, मोहन नारंग, निखिल स्वामी, सचिन कुलथे आदी उपस्थित होते. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बहुतांशी रुग्णांची घरे लहान असल्याने त्यांना घरी उपचार देता येत नाही त्यांना कोविड सेंटर लाच दाखल करावे लागत आहे त्यामुळे अशा रुग्णांची चांगली सोय व्हावी म्हणून हे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय सर्व शिवसैनिकांनी घेतला असे अनिल सोनवणे यावेळी म्हणाले. 

लिंगाळी गावचे सरपंच सुनील जगदाळे, नगरसेवक वसीम शेख, राजेश जाधव तसेच स्वप्निल शहा, मनीष परकाळे, गणेश भोसले, शशांक दादर, बालाजी सूर्यवंशी यांचे कोविड  सेंटर सुरू  करण्या साठी मोलाचे सहकार्य लाभले. शिवसैनिक अमोल जगताप,नामदेव राहिंज, शैलेश पिल्ले, सागर मधुर कर, गणेश भोसले, रवींद्र बंड, गणेश दळवी, अशोक काशीद हे कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची सेवा करणार आहेत.