Categories: Previos News

Shiv Jayanti – दौंड शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी



दौंड : सहकारनामा

शहरातील सर्व शिव प्रेमींनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. 

सर्वप्रथम नगराध्यक्षा शितल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी पाळणा गीत गात शिवजन्म सोहळा साजरा केला. नंतर शहरातील जमलेल्या सर्व शिवप्रेमी, पक्ष, संघटना व विविध समाजातील प्रमुखांच्या उपस्थिती मध्ये शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.



मोठ्या संख्येने जमलेल्या शिवभक्तांनी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन केले. दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नगराध्यक्ष शितल कटारिया सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.



शिवजयंती निमित्ताने येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक सजावट करण्यात आली होती, सजविलेल्या अश्वारूढ पुतळ्या सोबत शिवप्रेमींनी सेल्फी फोटो घेत शिवजयंतीचा आनंद साजरा केला.

Sahkarnama

Recent Posts

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…

1 दिवस ago

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

2 दिवस ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

2 दिवस ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

3 दिवस ago