Categories: पुणे

शिवजयंती निमित्ताने दौंडमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दौंड : दौंड शहर व तालुका शिवजयंती समितीच्या वतीने ३० एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नितीन वाघ यांनी दिली आहे.
 सालाबादप्रमाणे दोन वर्षांच्या खंडानंतर दौंड शहरात तिथीनुसार २ मे रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शिवजयंती निमित्त दौंड – सिध्दटेक रस्त्यावरील स्वर्गीय लाजवंती गॅरेला विद्यालयात शनिवारी (ता. ३०) सकाळी 10 वा. या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी पहिला गट (इयत्ता १ ली ते ४ थी), दुसरा गट (इयत्ता ५ वी ते ८ वी ) , तिसरा गट ( इयत्ता ९ वी ते १२ वी) आणि चौथा गट – खुला गट, असे चार गट तयार करण्यात आले आहेत.
गटनिहाय विषय पुढीलप्रमाणे  : –

  • गट पहिला (इयत्ता १ ली ते ४ थी ) विषय : १)  मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय   २) मी राजमाता जिजाऊ बोलतेय ३) मी छत्रपती संभाजी महाराज बोलतोय
  • गट दुसरा (इयत्ता ५ वी ते ८ वी)  विषय : १)  राजमाता जिजाऊ : चरित्र व कर्तुत्व २) आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ३) मी रायगड बोलतोय  ४) माझा आवडता शिवरायांचा शिलेदार
  • गट तिसरा  ( इयत्ता ९ वी ते १२ वी )  विषय :  १) शिवरायांचा आठवावा प्रताप २) स्वराज्यरक्षक : संभाजी महाराज ३)  लाँकडाऊनने जगणे शिकवले ४) महिला सबलीकरण : वास्तव आणि अपेक्षा
  • खुला गट विषय : १) छत्रपती शिवराय –  व्यवस्थापनगुरू २ ) लॉकडाऊनमध्ये गवसलेली नाती ३ ) आम्हांला खरचं राजे समजलेत काय ? ४ ) व्यसन सोशल मिडीयाचे , पालटले चित्र समाजाचे
    विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
    स्पर्धेच्या विनामूल्य नाव नोंदणी व माहितीसाठी सोमनाथ लवंगे ( ७०८३२७६१८३) किंवा डॅा. प्रा. अरूणा मोरे (९८५००१४५७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

8 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago