अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या( दौंड शहर व तालुका) वतीने हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजे श्री शिवरायांच्या जन्मोत्सवाचे (19 फेब्रुवारी, शासकीय शिवजयंती) आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दौंड कसबे व पंचक्रोशीत दवंडी रथाचा चा शुभारंभ करून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात येणार आहे. दि.17 फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी मर्दानी खेळ, प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन (पोलीस स्टेशन समोर), दि. 18 फेब्रुवारी रोजी रक्तगट व मधुमेह तपासणी शिबिर (पोलीस स्टेशन समोर) चे आयोजन करण्यात आले आहे.

दि.19 फेब्रुवारी रोजी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा (छत्रपती शिवाजी महाराज चौक), घरोघरी शिवजन्मोत्सव देखावा स्पर्धा, शिवजन्म सोहळा, शिवरायांना अभिवादन- मानाचा मुजरा, मर्दानी खेळ व लेझीम, महाराष्ट्र गीत सादरीकरण (नवयुग शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी), आंतरशालेय शिवकालीन जिवंत देखावा व चित्ररथ स्पर्धात्मक शोभायात्रा, जिवंत देखाव्यांचे स्पर्धात्मक सादरीकरण व पारितोषिक वितरण समारंभ आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.