गाडी घासल्याने केडगाव-चौफुला रोडवर ट्रक ड्रायव्हरला बेदम चोपले

दौंड : शिरूर-सातारा हायवेवर असणाऱ्या केडगाव-चौफुला रोडवर सीएनजी गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि स्विफ्ट कारची साई दर्शन हॉस्पिटल समोर घासाघीस झाल्याने ट्रक ड्रायव्हरला दोन चारचाकी वाहनांतील 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत ट्रक ड्रायव्हर दत्तात्रय विठ्ठल पिसे (रा.केडगाव ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार स्विफ्ट कार आणि एक होंडा सिटी कारमधील 5 ते 6 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिसे यांच्या ताब्यातील टेम्पो टाटा १५१२ गाडी नंबर एम एच १४ जे एल ४४९७ मध्ये सीएनजी टाक्या भरून जात असताना सिल्वहर रंगाची स्विफ्ट कार गाडी नंबर एम एच ४२ के ४२८० हिस ओव्हरटेक करीत असताना दोन्ही गाडयामध्ये घासाघीस झाल्या कारणावरून पिसे यांना स्विप्ट गाडी व होंडा कंपनीची होंडा सी टी (गाडी नंबर माहीत नाही) या दोन गाड्यांमधील ५ ते ६ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर जमाव
जमवुन हाताने व लाथाबुक्यांनी मारहण
करून त्यातील एकाने त्याचे धातुच्या हातातील मनगटी कडयाने पिसे यांच्या डोळयाजवळ, ओठावर व नाकावर मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक तपास सफौ जाधव करीत आहेत.