Categories: क्राईम

Breaking News – शिरूर पाठबंधारे परीसरात गोळीबार, एक ठार तर एक गंभीर

शिरूर

न्यायालयात सुरु असलेल्या पोटगीच्या वादातून एका माजी सैनिकाने शिरूर पाठबंधारे परीसरात स्वतःची पत्नी आणि सासूवर बेछुट गोळीबार केला असल्याची गंभीर घटना आज मंगळवारी घडली आहे.

सदर इसमाने स्वतःच्या पत्नीवर आणि सासूवर तीन गोळ्या झाडल्या असून यातील दोन गोळ्या पत्नीला लागल्याने तीचा जागीच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या सासूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेछुट गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव दीपक पांंडुरंग ढवळे (वय ४५, रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे असून त्याच्या गोळीबारात त्याची पत्नी मंजुळा दीपक ढवळे (वय ३५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.

दिपक आणि मंजूळा यांच्यामध्ये शिरूर न्यायालयात पोटगीचा वाद चालू होता. आज त्या दाव्याचा निकाल असल्याने दोन्ही बाजूचे लोक शिरूरच्या न्यायालय परीसरात आले होते. निकालासाठी दीपक आणि मंजुळा हे आल्यानंतर अगोदर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दीपकने आपल्या जवळ असलेल्या पिस्तूलातून पत्नी मंजुळा आणि सासूवर गोळीबार सुरु केला. यात मंजुळा हिला दोन गोळ्या लागल्या तर तर तिच्या आईला म्हणजेच हल्लेखोराच्या सासूला एक गोळी लागली. यात मंजुळा जागीच ठार झाली तर सासू तुळसाबाई ही गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आरोपीने नागरिकांना आणि पोलिसांना भीती दाखविण्यासाठीही हवेत गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी दीपक ढवळे यास अटक केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago